विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथील शेतकरी कर्जापाही कंटाळून आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
आज दिनांक ६ फरवरी २०२६ दुपारी ११ चे दरम्यान पोर्ला येथील शेतकरी गिरिधर कोलते वय ६२ हे शेतावर गेलेत व दुपारच्या सुमारास आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आपली जिवन यांत्रा संपविली. गावकऱ्यांना माहीत होतास पोलीस पाटिल हितेंद्र
बारसागडे यांनी पोलीस स्टेशन गडचिरोली माहिती दिली असता ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहचले मर्म दर्ज करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले.
गिरिधर कोलते यांचे पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे. गिरिधर कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलल्या जाते

Post a Comment