विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी असलेले श्री विनोद मोहन फुलबांधे वय 50 वर्ष यांची दि.13..2..2026 रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथे खाजगी दवाखान्यात दाखविण्यात आले . परंतु डॉक्टरांनी त्यांच्या घशामध्ये इन्फेक्शन होऊन त्यांना अति त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपुर येथे भरती करण्यास सांगितले लगेच त्यांना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून नागपूर येथे मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर व सचिव भारत कुंमरे यांना वैरागड येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली असता त्यांच्या नातेवाईक यांना भेटून त्यांना पुढील योग्य उपचाराकरिता सामाजिक दायित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक शहरी व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने दहा हजार रुपयाची आर्थिक मदत धनादेश स्वरूपात देण्यात आली.
विनोद फुलबांधे हे वैरागड येथील रहिवासी असून गावामध्ये त्यांचा मनमिळावू स्वभाव गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हिरारीने भाग घेऊन ते भजन गायनाचे काम सुद्धा करीत असतात गावामध्ये शांत सयमी राहून गावातील सार्वजनिक उपक्रम चांगल्या प्रकारे यशस्वीरीत्या पार पाडण्यात त्यांचा नेहमी सहभाग राहत असल्याने वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्याबद्दल सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहरी सामाजिक व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश रामाजी बनकर संस्थेचे सचिव भारत मधुकर कुमरे यांचे विनोद फुलबांधे यांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे सदर आर्थिक मदत ही विनोद दादा मसराम अखिल भारतीय आदिवासी संघटना उपाध्यक्ष नागपूर ,दीपक भाऊ इंगळे सामाजिक कार्यकर्ते नागपूर यांच्या सहकार्यातून आणि संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सदर आर्थिक मदत देताना संस्थेचे अध्यक्ष दिनेश रामाजी बनकर सचिव भारत मधुकर कुमरे संस्थेचे संचालक दिलीप नाकाडे संस्थेच्या कोषाध्यक्ष अश्विनी मिलिंद गोवर्धने संतोष कुरवडकर, आकाश मडावी ,नीरज पितुलवार, उल्हास बनपूरकर, मनोज सोरते,प्रल्हाद बोर्डे ,अविनाश लिंगायत वैरागड येथील सुरेश लांजिकर, प्रमोद तावेडे,अविनाशखरवडे,राहुल बनकर ,खरवडे ताई,तावेडे ताई आधी उपस्थित होते.

Post a Comment