विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
भामरागड - भामरागड तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेली धोडराज ग्रामपंचायत नेहमीच कुलुपबंद असतो सदर ग्रामपंचायतला कोणी वाली आहे कि नाही अशी शक्यता बढावली आहे. ना ग्रामसेवक , ऑपरेटर ना चपराशी अश्या ग्रामपंचायवर बिडिओ भामरागड चे वरदहस्त तर नाही ना !
भामरागड ते लाहेरी रस्त्यावर एक कि.मी अंतरावर धोडराज ग्रामपंचायत आहे परंतु सदर ग्रामपंचायत कुलुप बंद असल्यामुळे ग्रामपंचायत चा वाली कोणीच नाही ग्रामस्थाचे अनेक कामे असतात परंतु ग्रामसेवकच हजर राहत नाही तर ग्रामस्थाने कुणाकडे दाद
मागायची. ग्रामसेवक महाशय भामरागड येथेच राहतात अतिदुर्गम भाग असल्यामुळे ग्रामसेवक गेला किंवा नाही माझे कोणीही काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात ग्रामसेवक वावरतांना दिसतो. यांचेवर संवर्ग विकास अधिकाऱ्याचे वचकच दिसत नाही.


Post a Comment