विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे रमाबाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करून रमाईला १२८व्या जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज यांच्या आयोजनात हा अनोखा उपक्रम पार पाडण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले पश्चात फीत कापून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.वैचारिक प्रबोधन करतांना विशेष अतिथी इंजि.विजय मेश्राम यांनी लोकांचा कल हा मनोरंजनाचे वळलेला दिसतो रमाईच्या पराकोटीचा त्याग व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय यांचा त्यांना विसर पडत चाललेला आहे याबद्दल खेद व्यक्त केला.तर प्रा.ॠतुजा बोदेले यांनी समिती च्या क्रियाशील ते बद्दल अभिनंदन केले व अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन केले.अध्यक्षिय भाषणात रमाबाई टेंभुर्णे यांनी रमाईच्या त्याग व समर्पण यामुळे बाबासाहेबांना आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची शक्ती मिळाली असे म्हटले. विशेष अतिथी प्रा.डाॅ.रिता राऊत ,श्रेया सुनील आमटे,पुरूषोत्तम दुधे, मारोती जांभूळकर,प्रा.प्रकाश बारसागडे तर प्रमुख अतिथी हर्षा राऊत,डॉ प्रमोद उंदीरवाडे,प्रा.निहार बोदेले, डॉ संजय मेश्राम,दुधराम शेंडे, कल्पना कापसे यांची उपस्थिती प्राथनिय ठरली.याप्रसंगी रुहानीका गेडाम चंदुराव राऊत, पुरूषोत्तम बडोले, प्रतिभा बडोले, यशोदा मेश्राम यांनी रमाईवर गीत सादर केले.सुत्रसंचालन सरीता बारसागडे तर आभार समितीच्या अध्यक्ष ममता जांभूळकर यांनी केले.कार्यक्रमाला समितीच्या सचिव श्यामला राऊत,उपाध्यक्ष रत्नमाला बडोले, कोषाध्यक्ष कविता मेश्राम सभासद प्रतीमा शेंडे, प्रतिभा बडोले, आशा रामटेके, दुर्गा रंगारी,मंदा शिंपोलकर यांनी सहकार्य केले.
दीक्षाभूमी देसाईगंज येथे समता सैनिक दलाचे तीन दिवसीय आंतरजिल्हा निवासी प्रशिक्षण ८,९,१०फेब्रूवारीला होणार आहे तसेच तसेच समता सैनिक दल दीक्षाभूमी देसाईगंज शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे तरी परीसरातील बंधू भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेश करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेत सामील होऊन संघटन बळकट करावे असे समीती तर्फे आव्हान करण्यात आले आहे.

Post a Comment