घोटसुर ग्रामपंचायत रामभरोसे...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


एटापल्ली - एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्याच्या गावाला लागुन असलेली घोटसुर ग्रामपंचायत सदैव कुलुपबंद असतो. या ग्रामपंचायत मधे ना चपरासी ना ग्रामसेवक कधिही हजर राहत नसुन सदर ग्रामपंचायत रामभरोसे असतो.



अतिदुर्गम भाग असल्यामुळे संवर्ग विकास अधिकारी एटापल्ली हे या गावात कधिच जात नाही त्यामुळे ग्रामसेवकांचे चांगलेच फावले आहे. ग्रामसेवक मुख्यालयी न राहता गडचिरोली शहरात राहतो व महिण्यातून एकदाच ग्रामपंचायत मधे जातो पगार भत्ते मात्र वेळेवर घेतो अश्या अवशी पुणवेला ग्रामपंचायत



 मधे जाणाऱ्या ग्रामसेवकामुळे घोटसुर ग्रामस्थाचे कामे होत नाही अशी ओरड गावकऱ्यांची आहे. या ग्रामसेवकां वर बिडिओ एटापल्ली मेहरबान तर नसावे ना ! अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.

0/Post a Comment/Comments