विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
धानोरा - मुख्यमंत्री समुह पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पेंढरी व उमेद महाराष्ट्र राज्य जिव नोनती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गोटुल भवन पेंढरी येथे एकल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
एकल महिला मेळाव्याचे अध्यक्ष पेंढरी ग्रामपंचायतचे सरपंच पवन येरमे गटविकास अधिकारी पवार वैद्यकिय अधिकारी त्रिपुरवार ग्रामविकास अधिकारी छगन खुणे , दुबे साहेब ,चौधरी साहेब ,मडावी सर आदीची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमात विविध साहित्याचे स्टॉल लावले होते. सदर कार्यक्रमात घटस्फोटीत विधवा महिलांना मार्गदर्शन सक्षमीकरण व प्रत्यक्ष योजनेचा लाभ देण्याकरीता सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच येरमे यांनी सांगीतले की शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु बऱ्याच महिलांना योजनेची
माहिती नाही बचत गटासाठी कर्ज , आटा चक्की मिनि ट्राक्टर मुख्यमंत्री योजना रुग्णाला मदत बँकेच्या विविध योजना या योजनेची माहिती करून घेऊन योजनेचा लाभ घ्यावा अश्या प्रकारचे मार्गदर्शन सरपंच येरमे यांनी केले. यात प्रमुख पाहुण्याचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास पेंढरी परिसरातील बहुसंख्य महिलांनी मेळाव्यात उपस्थिती दर्शविली कार्यक्रमास सुनिता गुरनुले , संध्याताई येरमे लेनगुरे , हिमा दुगा , मोरेश्वर मोहुर्ले , जिवनज्योती प्रभाग संघाच्या महिला , उमेदचे कर्मचारी , ग्रामपंचायत चे सदस्य व कर्मचारी यांनी सहकार्य केले .



Post a Comment