गडचिरोली शहरातील बीएसएनएल मोबाईल नेटवर्क इंटरनेट सेवा सुरळीत करा ..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिले निवेदन. बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा.




विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली


गडचिरोली शहरामध्ये BSNL मोबाईल नेटवर्कच्या सेवेमध्ये मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये BSNL चे नेटवर्क अत्यंत कमकुवत होत असून, मोबाईलवर कॉल न लागणे, वारंवार कॉल ड्रॉप होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू न येणे तसेच इंटरनेट सेवा 


अत्यंत धीम्या गतीने चालणे अशा समस्या नागरिकांना सातत्याने जाणवत आहेत.
BSNL ही सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार सेवा असल्याने शहरातील अनेक नागरिक BSNL च्या सेवेवर अवलंबून आहेत. विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ऑनलाइन व्यवहार व डिजिटल सेवांचा वापर करणाऱ्या नागरिकांना नेटवर्कच्या समस्येमुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
गडचिरोली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय 


असल्यामुळे येथे दूरसंचार सेवा सक्षम व सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे BSNL प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेच्या प्रमुख मागण्या :
गडचिरोली शहरातील BSNL नेटवर्कची तातडीने सर्वसमावेशक तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
ज्या भागांमध्ये नेटवर्क सिग्नल कमी आहे, त्या 

ठिकाणी नेटवर्कची क्षमता वाढविण्यात यावी.
वारंवार बंद पडणारे किंवा तांत्रिक बिघाड असलेले मोबाईल टॉवर तातडीने दुरुस्त करण्यात यावेत.
कॉल ड्रॉप व कॉल कनेक्टिव्हिटीची समस्या तातडीने दूर करण्यात यावी.
BSNL 4G इंटरनेट सेवेचा वेग व स्थिरता सुधारण्यात यावी.
शहरातील नेटवर्क कव्हरेजची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त तांत्रिक उपकरणे/पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या नेटवर्क तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात यावी.
करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती व 



त्यासाठीची कालमर्यादा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला कळविण्यात यावी.
वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन गडचिरोली शहरातील BSNL नेटवर्क व इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गडचिरोली येथील BSNL कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांना निवेदनातून करण्यात आली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने BSNL. प्रशासनाला दिला आहे. निवेदन देताना महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश संतोषवार ,विवेक डोंगरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष, प्रकाश कुडमेथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर प्रमुख




उमाकांत साळवे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गडचिरोली शहर संघटक व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments