कडोली येथे दारू विक्री जोमात .. प्रशासन मात्र कोमात.. युवा पिढी दारूच्या आधीन.. प्रशासन लक्ष देणार कधी? ग्रामस्थांचा प्रशासनाला संतापजनक सवाल..



विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
तालुका प्रतिनिधी 
कुरखेडा 



कढोली येथे दारू विक्री जोमात .. प्रशासन मात्र कोमात..
युवा पिढी दारूच्या आधीन.. प्रशासन लक्ष देणार कधी? ग्रामस्थांचा प्रशासनाला संतापजनक सवाल..


कुरखेडा तालुक्यातील  कडोली येथे बऱ्याच दिवसापासून दारू विक्रीने कहर केला आहे 
कडोली येथे सर्रासपणे दारू विक्री होत असल्याचे दिसते आहे. सदर दारू विक्रीमुळे कडोली व परिसरातील युवा पिढी दारूच्या आधीन झाली असून  बरबादीच्या मार्गावर आहे .



कडोली येथे दारू विक्रीमुळे महिला व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसते आहे .
अवैध रित्या होणाऱ्या भेसळ दारू विक्रीमुळे कितेक जणांना जीवघेणे आजाराने सुद्धा ग्रासले आहे.

कडोली येथे काही दिवसापूर्वी प्रशासनाने  ताडी विक्रेत्यावर मोठ्या धाडसाने कारवाई केली होती आणि त्या कारवाईचे स्वागत करून जनतेकडून प्रशासनप्रति   समाधान सुद्धा व्यक्त  करण्यात आले होते.
अवैधरित्या होणारी भेसळ दारू विक्री मात्र बिनधास्तपणे  खुलेआम पने सुरू असल्याने सुजान नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 
दारू विक्री जोमात.. अन् प्रशासन मात्र कोमात.. असा सूर आता जनतेच्या तोंडून उमटू लागला आहे. 

 ही दारू विक्री बंद होणार कधी? असा संतापजनक सवाल  आता प्रशासनाला जनता विचारू लागली आहे.

अवैधरित्या होणाऱ्या भेसळ दारूविक्रीमुळे कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले असून कढोली व परिसरातील युवा पिढी नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. 

दारू विक्री करणारे मालामाल झाले असून पीनारे मात्र कंगाल ,बरबाद मृत्यूच्या दारात उभे आहेत


 प्रशासनाने कढोली येथे भेसळयुक्त अवैधरित्या होणारी दारू विक्री बंद करावी आणि दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी असे आता कढोली येथील महिला भगिनी व सुजान नागरिकाकडून प्रशासनाला मागणी होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments