विदर्भ दखल न्यूज
पी. के. सातार
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी
चामोर्शी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ :
नवशक्ती शारदा उत्सव मंडळ, ग्रामीण रुग्णालय परिसर, चामोर्शी येथे शारदा उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापना व मूर्तिस्थापना कार्यक्रम भक्तिमय वातावरणात ,११ आकटोबर रोजी उत्साहात पार पडला.
सकाळी ९.०० वाजता आदरणीय डॉ. सुशील राय सर यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता आदरणीय डॉ. शिवराम कुमरे सर यांच्या शुभहस्ते शारदा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात भक्तिमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले. शारदा देवीच्या पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली असून, भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे
नवशक्ती शारदा उत्सव मंडळाच्या वतीने शारदा देवीच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त परिसरातील भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
जय शारदा माता!

Post a Comment