विदर्भ दखल न्यूज
पी. के. सातार
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी
सोनापूर (ता. चामोर्शी) : समर्पण बहुउद्देशीय संस्था, मुरमाडी, जि. गडचिरोली यांच्या वतीने सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, सोनापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महात्मे हॉस्पिटल, नागपूर यांच्या सहकार्याने नागरिकांची नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ४६ मोतीबिंदू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी महात्मे हॉस्पिटल, नागपूर येथे रेफर करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा मिळावी आणि डोळ्यांच्या आजारांचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविणजी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपाध्यक्ष श्री. प्रणय साखरे, सचिव श्री. दुर्योधन मडावी, श्री. बुधाजी गेडाम, श्री. संतोष कुमरे, श्री. मनोहर हेडाऊ, सौ. ओमलता बोरकर तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
समर्पण बहुउद्देशीय संस्था विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करत असून, या शिबिरातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली.


Post a Comment