बांधगाव येथील मामा तलावाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा ग्रामस्थांची आजाद समाज पार्टीकडे मागणी.. तालुकाप्रमुख चेतन काटेंगे यांनी मामा तलावाच्या कामावर प्रत्यक्ष जाऊन केली पाहणी..

विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
कुरखेडा









कुरखेडा तालुक्यातील बांधगाव येथे मामा तलावा करिता पाण्याची साठवणूक आणि तलावातील पाण्याच्या संदर्भाने वेस्ट वेअर यासोबतच तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्याकरिता पाटाचे काम सिंचाई विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले होते आणि ते काम झाले सुध्दे.

मात्र सदर काम आणि झालेल्या कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांच्या वतीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे



शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले पाट बांधकामही अपेक्षित दर्जाचे नसून सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे म्हणणे आहे

तलाव व पाट बांधकामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित सिंचन सुविधा मिळत नसल्याची शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.




शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही कामे कागदोपत्री मोठ्या निधीची दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता व कामाचा दर्जा कमी, ठिसूळ व कच्च्या स्वरूपाची असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे का? असा सवाल बांधगाव येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


बांधगाव येथील मामा तलावाच्या संपूर्ण कामासह संबंधित पाट बांधकाम, वेस्ट वेअर बांधकाम सबंधित कामाचे मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक, बिल-वाउचर आणि कामाची गुणवत्ता तपासणी आणि कामावर झालेल्या प्रत्यक्ष खर्चाची तपासणी उच्च स्तरातून केली जावी अशी बांधगाव येथील शेतकऱ्यांची मागणी आहे

शेतकऱ्यांनी आजाद समाज पार्टीला दिला निवेदन

आजाद समाज पार्टीचे कुरखेडा तालुका प्रमुख चेतन काटेंगे यांनी प्रत्यक्ष आपल्या टीम सोबत बांधगाव येथे जाऊन मामा तलावाच्या कामाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाच्या चौकशीबाबत निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना आश्वासित केले.



तलावाच्या कामावर सार्वजनिक रित्या मोठा निधी खर्च होऊनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसेल, तर या कामाची गुणवत्ता आणि निधीच्या विनियोगाची सखोल चौकशी करण्याकरिता जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करून योग्य चौकशी लावण्यात येईल असे आजाद समाज पार्टीचे तालुकाप्रमुख चेतना काटेंगे यांनी बांधगाव येथील ग्रामस्थांना सांगितले आहे.



बांधगाव येथील मामा तलाव कामाच्या संदर्भात कामाच्या चौकशी करिता दोन ते तीन निवेदने पंचायत समिती कुरखेडा संबंधित विभागाला देण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र सदर निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याचे सुद्धा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


बांधगाव येथील मामा तलावाच्या कामाची वरिष्ठ स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागनी बांदगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments