विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर ब्युरो
नागभीड
सध्याच्या घडीला पावसाने दडी मारली आहे यामुळे धान्याचे पीक करपण्याच्या मार्गावर आहेत निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे आणि अशातच नागभिड तालुक्यातील मींथूर येथील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मुखरु लक्ष्मण दडमल वय 65. वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे . रविवारच्या दिवशी मुखरु दडमल हे आपल्या नातवा सोबत घरी असलेल्या गुरांसाठी चारा आणण्याकरिता तलावाकडे गेले होते नातू चार गोळा करीत असताना मुखरु दडमल यांनी तलावाकडे जाऊन उडी घेतली सदर बाब नातवाच्या लक्षात येताच नातवाने सदर घटनेची माहिती गावात दिली गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून
पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


Post a Comment