विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
दि. १० ऑक्टोबर २०२६
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव मा. श्री. रमेशजी भुरसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली येथील माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्नेहपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी रमेशजी भुरसे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना मिठाई भरवून दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या आनंददायी सोहळ्याला भाजपचे नगरसेवक सागरजी निंबोरकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, भाजपा नेते अविनाशजी विश्रोजवार, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment