आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर यांची प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला मागणी

विदर्भ दखल न्यूज 
तालुका प्रतिनिधी 
 आरमोरी 


 गडचिरोली  जिल्हा अंतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षीच्या चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये लागवड केलेल्या धान्य पिकांवरती खोड किडी ,करपा तुडतुडा या रोगांनी आक्रमण केल्याने पूर्णतः शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झालेले आहे उसनवार पैसे घेऊन धान्य पिकावर  शेतकऱ्याकडून वारंवार कीटकनाशकाची फवारणी केली जात आहे मात्र धान्य पिकाला लागलेल्या रोग नियंत्रणामध्ये येत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे धान्याचे पीक कोलमडल्याने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्या वरती मोठे संकट ओढवले आहे. शासनाने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील दुष्काळ घोषित यादीमध्ये आरमोरी तालुका समावेश नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये श्यासनप्रती रोष दिसत आहे. प्रशासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांची गंभीरता लक्षात घेऊन जिल्ह्यातील आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांकरिता काही महत्त्वाच्या उपाययोजना शासनाने कराव्यात आणि शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास  संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकातून मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments