*सरपंच संघटनेच्या बेमुदत उपोषणाची माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते सांगता..


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 

कुरखेडा : तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्यावर कार्यवाही करण्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर 
सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर सांगता करण्यात आली. उपोषणस्थळी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले.
कुरखेडा तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने वादग्रस्त सहाय्यक गट विकास अधिकारी देवांश उराडे यांच्यावर कारवाई करण्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणादरम्यान सरपंच व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी काम करताना येणाऱ्या अडचणी या संदर्भात सुद्धा चर्चा केली.
उपोषणाची सांगता करताना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता केली. यावेळी तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, गटविकास अधिकारी धीरज पाटील, सागर निरंकारी, उल्हास देशमुख,यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच संघटनेने माजी आमदार कृष्ण गजवे यांनी सहकार्य केल्यामुळे त्यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरपंचांच्या मागण्या व ग्रामपंचायतींसमोरील प्रश्नांवर चर्चा केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
उपोषणाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सरपंच व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी ग्रामपंचायतींच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपोषणस्थळी झालेल्या या कार्यक्रमामुळे सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच आणि प्रशासनातील अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .

0/Post a Comment/Comments