विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
कुरखेडा तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या सोनसरी व परिसरात दारू विक्रेत्यांनी आपले अवैध दारू विक्रीचे जाम बसवले आहे. मोह फुलाची व देशी दारू परिसरामध्ये अवैधरित्या विक्री होत आल्याचे पहावयास मिळत आहे. या अवैध दारू विक्रीवर आळा घालण्याची जबाबदारी? कुणाची असा प्रश्न आता सुजाण नागरिकांना पडला आहे.सोनसरी परिसरातील युवा वर्ग दारूच्या आधीन झाले असून युवा वर्गाची दिशा बरबादीच्या वाटेवर आहे . अवैध दारू विक्रीमुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात बऱ्याच दिवसापासून अवैध दारू विक्रीने डोके वर काढले असल्याने परिसरातील शांतता व सुव्यवस्था भंग होताना दिसत आहे. सदर दारू विक्री प्रशासनाला दिसत नाही काय? असा प्रश्न परिसरातील नागरिक यांच्या तोंडून विचारला जाऊ लागला आहे. अवैध रित्या मोहफुलाची व देशी दारू विक्रेत्याला अभय कुणाचे? प्रशासनाच्या मुक आशीर्वादाने खुले आम पने दारू विक्री सुरू आहे आहे असे सुद्धा नागरिकांकडून बोलले जात आहे. दारू विक्रेते मालामाल गब्बर झाले असून पिणारे मात्र बरबाद, कंगाल, बेहाल मृत्यूच्या दारात उभे आहेत गोर गरीब सर्वसामान्य घरातील लोकांच्या परिस्थिती दारूमुळे नेस्तनाबूत झाल्याचे दिसत असताना सुद्धा प्रशासनाला का? म्हणून जाग येत नाही.. असा सवाल आता जनता विचारू लागली आहे.
दारू विक्रेत्यांची "मुजोरि, कुणामुळे..! खपतेय यांना पाठबळ,आश्रय, हिम्मत सहकार्य देणारा कोण? आहे . याचा जनतेनी शोध घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने अवैध होणारी दारू विक्री बंद करावी आणि दारू विक्रेत्याना चांगली अद्दल घडवावी अशी मागणी आता जनतेमधून पुढे येऊ लागली आहे .

Post a Comment