वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटूंबियाची आपचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांची सांत्वन भेट


  विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


   गडचिरोली तालुक्यातील वसा चक2 येथिल बाळू विठ्ठल राऊत वय 45 वर्ष  हे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वसा येथे निवासस्थानी भेट देवून आस्थेने विचारपूस करण्यात आले भूमिहीन, मोलमजुरी करणारे कुटूंबीय आहे मृत वयक्ती हे शेळ्या राखण्यासाठी जंगलात गेले होते त्यावेळेस वाघाने हल्ला केला व मृत्यू पावले वनविभागाचे तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामा केले असे कुटूंबियांनी सांगितले प्रशासनाकडे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे बाळकृष्ण सावसाकडे यांनी आश्वासन दिले व कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी धीर देण्यात आले
 भेटी दरम्यान मृतकाची पत्नी सपना राऊत,वडील विठ्ठल राऊत,आई कमलाबाई राऊत,मोठे भाऊ संजय राऊत,  सासरे जनार्धन बोदेले,त्यांच्या दोन मुली उपस्थित होत्या

0/Post a Comment/Comments