54 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. चामोर्शी तालुक्यातील घटना.. आत्महत्येचे कारण अस्पष्ट..

 
विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
चामोर्शी 


चामोर्शी तालुक्यातील रामपूर गावातील एका 54 वर्षीय इसमाने गळफास घेतल्याची घटना 25 सप्टेंबरला पहाटे सुमारास उघळकीस आली.भाऊजी सलामे 54 वर्ष असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथील भाऊजी सलामे वय 54 वर्ष याने आपल्या राहत्या घराच्या खोलीमध्ये घराच्या आड्याला दोरी बांधून  गळफास घेतला . सदर घटना सकाळी उघडकीस आली सदर घटनेची माहिती घरच्या लोकांना माहीत होताच घरच्यांनी एकच टाहो फोडला यामुळे सदर घटनेची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली पोलीस पाटलांनी लगेच आष्टी पोलिसांना घटनेची माहिती दिली. आष्टी पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल होऊन मृतकाचा पंचनामा करून मृतकाचे शव शव विच्छेदनाकरिता  ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले व शव विच्छेदनानंतर मृतकाचे शव नातेवाईकांच्या सुपूर्त केले. मृतक भाऊजी सलामे याने एवढे मोठे टोकाचे पाऊल का? बरं..! उचलले असावे हे मात्र अस्पष्ट आहे. सदर प्रकरणाच्या तपासाअंती कळू शकेल . मृतक भाऊजी सलामे हा एकाकी गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेच्या पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments