विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली आरमोरी
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोसबी येथे उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाने झाली. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.कविताताई ताडाम सरपंच ग्रामपंचायत कोसबी, श्री गुलाब जुमनाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मा.प्रलय चहांदे उपसरपंच, अनिता लिंगायत, दिनेश बनकर, विनोद मानकर, गुलाब ताडम , ईश्वर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायत, व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची माहिती देणारी भाषणे, देशभक्तीपर गीते, कविता व घोषवाक्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “माझा देश, माझा अभिमान” हा संदेश देत देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गोवर्धन शेंडे, संचालन श्री प्रशांत ठेंगरे तर आभारप्रदर्शन हेमलता आखाडे मॅडम यांनी मानले.




Post a Comment