विदर्भ दखल न्यूज
तालुका प्रतिनिधी
आरमोरी
आरमोरी ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार म्हणून रुजू झालेले श्री सचिन झनक सर यांचे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे वतीने गडचिरोली जिल्हाप्रमुख दिनेश बनकर यांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आरमोरी ठाण्याचे ठाणेदार श्री कैलास गवते सर यांचे धानोरा येथे स्थानांतरण झाल्याने त्यांच्या जागी अहेरी येथून आलेले आणि आरमोरी येथे नव्याने ठाणेदार म्हणून रुजू झालेले श्री सचिन झनक सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागता निमित्याने तालुक्यातील शांतता सुव्यवस्था व
तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला असता नवनियुक्त ठाणेदार यांनी तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिस प्रशासन सैदव प्रयत्नशील आहे आणि राहील आणि तालुक्यामध्ये अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असल्याचे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाप्रमुख दिनेश बनकर यांना. सांगितले नवनियुक्त ठाणेदार सचिन झनक सर यांना पुढील वाटचालीस पत्रकार सेवा संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment