विदर्भ दखल न्यूज
वृत्तसंस्था रांची
रांची येथे एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीआहे ही हत्या युवतीने तिच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीवर मिळालेल्या पैशाच्या लालचे पोटी केल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षांपूर्वी हत्या झालेल्या महिलेने हतेचा आरोप असलेल्या मुलीला सहा वर्षाची असताना दत्तक घेतले होते आणि हत्या झालेल्या महिलेचे पती हे चार वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता घरी महिला एकटी मुली सोबत राहत होती चार वर्षांपूर्वी मृतक महिलेचे पती विद्युत विभागांमध्ये कामाला असताना ते निवृत्त झाले होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यावर मृतक महिलेला भरपाई म्हणून 45 लाख रुपये मिळाले होते. हत्याचा आरोप असलेल्या मुलीचा त्या 45 लाख रुपये वरती डोळा होता आणि त्या पैशाच्या लालचे पोटी महिलेचा उशीने गळा दाबून तिचा खून केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याकरिता मृतक महिलेचे शव फ्रीजमध्ये ठेवले. मात्र शेजाऱ्यांना या घटनेची कुणकुण लागल्याने शेजाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनावर दिली पोलीस विभागांनी घटनास्थळावर जाऊन मृतक महिलेचा शोध घेतला असता घरातील फ्रीजरमध्ये मृतक महिलेचे शव आढळले लगेच मृतक महिलेचे शव ताब्यात घेऊन तपासाची चक्रे पोलीस विभागानेच गतीने फिरवून अखेर प्रकरणाचा छडा लावून महिलेच्या हत्या करणाऱ्या मुलीला व तिच्या प्रियकराला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना बिहार राज्यातील गया येथून अटक करण्यात केली आहे. अल्पवयीन मुलीने पैशाच्या लालचे पोटी आपल्या आईची हत्या केल्याने परिसरामध्ये हत्या करणाऱ्या मुलीबद्दल मोठी संतापाची लाट पसरली आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.


Post a Comment