विदर्भ दखल न्यूज
आरमोरी वैरागड
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथील नामे अशोक देवराव बोधनकर वय अंदाजे 35 वर्षे या युवा तरुण शेतकऱ्यांने सोमवारी दिवशी
आपल्या घरी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वैरागड येथील नामे अशोक देवराव बोधनकर वय 35 वर्षे या युवा शेतकऱ्याने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिवशी घडली सध्याच्या घडीला उन्हाळी धान्य पिकाचे धान
मळणीचे काम जिकडेतिकडे सुरू आहे आणि अश्यातच अशोक बोधनकर यांच्या शेतामध्ये सुद्धा धान मळणीचे काम सुरू होते अशी माहिती आहे धान मळणीचे कामा करिता अशोक बोधनकर हा युवा शेतकरी सकाळीच शेतावरती गेला होता आणि काही कामानिमित्त तो घरी परतल्याची माहिती आहे घरी परतल्यानंतर घरी कोणीही नसल्याचे पाहून त्याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली आहे.सदर घटना आजूबाजूच्या लोकांना . माहित होताच बघ्यांची एकच गर्दी जमली आणि मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती वैरागड येथील पोलिस पाटील यांच्या मार्फतीन आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा सुरू केला असल्याची माहिती आहे. अशोक देवराव बोधनकर या युवा शेतकऱ्याने एवढेमोठे टोकाचे पाऊल का? म्हणून उचलले असेल हे मात्र अस्पष्ट आहे. अशोक बोधनकर यांच्या पक्षात वृद्ध आई पत्नी मुलगा आणि मुलगी असा बराच मोठा परिवार आहे घरातील कर्ता युवा कर्तबगार युवा शेतकरी एकाएकी गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळलेआहे गाव परीसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस प्रशासनाने सदर घटनेचा तपास करून या आत्महत्या करण्या मागे कारण काय? असेल याचा पोलीस विभागाने शोध लावावा असे वैरागळवासीयांकडून बोलले जात आहे.


Post a Comment