मोहझरी नजीक डोंगरतमाशी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास होते अवैध वाळूची वाहतूक महसूल प्रशासन मात्र गाढ झोपेत

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली आरमोरी 



आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मोहझरी नजीक डोंगर तमाशी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील नदीपात्रातून राजरोसपणे रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असून महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याचे  दिसत आहे नदीपात्रजवळील पाण्याच्या टाकीजवळून रात्रीच्या सुमारास अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक होत असल्याने  खड्डे पडल्याचे दिसत आहे  आणि यामुळे पाण्याच्या स्त्रोताला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे मात्र प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करणार कधी असा प्रश्न परिसरातील जनतेकडून चर्चिला येत आहे.  या वाळूचे वाहतूक करणाऱ्या वाळू तस्कराना अभय कोणाचे असे सुद्धा जनमानसातून चर्चेला येत आहे मनमानी पणाने दादागिरी दाखवून रात्रीच्या सुमारास राजरोसपणे नदीपा त्रातून  वाळूचे अवैध उत्खनन करून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याने महसूल प्रशासनाचे सुद्धा फार मोठे नुकसान होतआहे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. काही ठिकाणी सहाशे रुपये ब्रास रॉयल्टी च्या नावावर पाच  ब्रासची रॉयल्टी काढून शेकडो ब्रास वाळूची वाहतूक केल्या जात असल्याचे सुद्धा जनमाणसातून बोलले जात आहे . महसूल प्रशासनाने अवैध उत्खनन करून अवैध वाळूची वाहतूक  करणाऱ्या तस्करावर  कारवाई करावी आणि रात्रीच्या सुमारास गस्त लावावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.
कोड 
आम्ही गस्तीवर असतो तेव्हा कुणीही 
अवैध वाळू वाहतूक करताना दिसत नाही 
सध्याच्या घडीला कुणी आढळल्यास कारवाई 
करण्यात येईल 
श्री किरंगे मंडळ अधिकारी

0/Post a Comment/Comments