दुचाकी चालकाने बसला धडक दिल्याने दुचाकी धारकाचा जागीच मृत्यू आरमोरी तालुक्यातील घटना

 विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 


आरमोरी तालुक्यातील वैरागड ते ठाणेगाव मुख्य मार्गावर दुचाकी चालकाने बसला धडक दिल्याने दुचाकी धारकाचा जागीच मृत्यू झाला सदर घटना दिनांक 24. 4. 2026 अंदाजे 6 ते6.30 वाज़े दरम्यान सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार ठाणेगाव येथील कर्मवीर   भूरसे वय 50 वर्ष राहणार ठाणेगाव हे वैरागड ला काही कामानिमित्त आले होते आणि आपले काम ऑटो आटोपून वैरागड वरून आपल्या स्वगावी ठाणेगाव कडे जाण्यास निघाले मात्र ठाणेगाव ते वैरागड मुख्य मार्गावरील वळणावर दुचाकी  वरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांनी समोर येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने  दुचाकी चालक भुरसे यांचा जागीच मृत्यू झाला .लगेच मुख्य मार्गाने येणाऱ्या प्रवासधारकांनी 108 ॲम्बुलन्स ला कॉल करून मदत मागितली असता 108 नंबर वरती प्रतिसाद मिळाला नाही आणि ॲम्बुलन्स सुद्धा वेळेवर आली नाही यामुळे घटनास्थळावर प्रवासधारकांनी रोष व्यक्त केल्याचे पहावयास मिळाले ।

0/Post a Comment/Comments