विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरम्यान मोठा अनर्थ टळला.. देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील प्रकार..


विदर्भ दखल न्यूज 
देसाईगंज 

मिळालेल्या माहितीनुसार 
सध्याच्या घडीला गोंडवाना युनिव्हर्सिटी अंतर्गत उन्हाळी परीक्षेचे सत्र सुरू झाले आहे आणि अशातच देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालय परीक्षा केंद्रावर दिनांक 4 मे रोजी सकाळच्या वेळेमध्ये मध्ये परीक्षा सुरू असताना अचानक सीलिंग पंखे खाली कोसळल्याने परीक्षा हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला आणि परीक्षा हॉल मध्ये बसलेले विद्यार्थी थोडक्यात बचावले आणि यामध्ये कोणतीही विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली नसल्याची माहिती  आहे. मात्र परीक्षा हॉलमध्ये कोसळलेले सीलिंग पंखे विद्यार्थ्यावरती पडले असते तर मोठी जीवितहानी झाली असती . परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा हॉलमध्ये सुसज्य सोयी आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड पिण्याच्या पाण्यापासून तर




 हवेच्या साधनापर्यंत परीक्षार्थी करिता व्यवस्था असने गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावरील हॉलमधील सदर सिलिंग फॅन हे कोणत्या कंडिशन मध्ये आहेत याची वेळोवेळी शाळा प्रशासनाने पाहणी करणे ही सुद्धा जबाबदारी आहे. परंतु तसे झाले नसेल आणि म्हणूनच हा प्रकार झाल्याचे दिसते आणि यावरून शाळा प्रशासनाचा हलगर्जीपण दिसतो आहे सीलिंग पंखे कोसळल्याने बाल बाल विद्यार्थी बचावले आणि याच्यामध्ये कोणतीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र परीक्षार्थी पालकाकडून शाळा व्यवस्थापनाच्या गलथान कारभारा बद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे परीक्षा केंद्रावर काही महत्विक प्रश्न उपस्थित होतात यामध्ये प्रामुख्याने परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्याकरिता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा हालचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते . विद्यापीठाने परीक्षा केंद्र ठरविण्यापूर्वी परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खरच योग्य आहे का? हे पाहणे महत्वाचे आहे 
परीक्षा  केंद्र  महाविद्यालय प्रशासनाच्या गलथान कारभारावर आता  पालकाकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मात्र या घडलेल्या प्रकारावर विद्यापीठाकडून महाविद्यालय प्रशासनावर कोणती कारवाई होते याकडे आता पालक तसेच जनतेचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments