*वैनगंगा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


प्रतिनिधी आरमोरी..     
              वैनगंगा विद्यालय चुरमुरा येथील दहावी परीक्षेचा निकाल शंभर  टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय संपादन केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वर्ग दहावीतील कुमारी टीना मोतीराम सातपुते हिने 75.40 % गुण मिळवीत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर तनिषा जीवन चौधरी हिने 74.60 टक्के. कृपाली मुखरू बोरकुटे हिने ७१.६० टक्के गुण प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार जी शेंडे यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे



 मुख्याध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून उच्च ध्येय गाठावे असे मार्गदर्शन मुख्याध्यापक शेंडे यांनी केले . यावेळी एस. बी. गेडाम.  बरडे सर. नागरे सर.मडावी सर.उरकुडे मॅडम. राऊत मॅडम.चुधरी मॅडम . आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments