आरमोरी देसाईगंज मुख्य मार्गावर कोंढाळा गावानजीक झाला भीषण अपघात .. अपघातामध्ये बांधकाम व्यावसायिकाचा झाला मृत्यू.. परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर..d


विदर्भ दखल न्यूज 
देसाईगंज 


वडसा देसाईगंज येथे मजुराची मजुरी वाटप करून व दैनदिन कामे आटोपून गावाकडे परत येत असताना वाटेतच ॲम्ब्युलन्सने दुचाकीला धडक दिल्याने एका बांधकाम व्यावसायिकाचा रुग्णालयात उपचाराकरिता नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गुरुदेव दिनाजी वसाके वय 38 वर्ष राहणार कोंढाळा असे अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे नाव आहे .प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुदेव वसाके 
 हे प्रापर कोंढाळा येथील रहिवासी असून ते बांधकामाचे ठेकेदारी पद्धतीने कामे करतात सध्याच्या घडीला त्यांचे देसाईगंज येथे बांधकामाची साइड सुरू असल्याने आजच्या दिवशी ते आठवडी मजुराची मजुरी देण्याकरिता 3 मे रोजी देसाईगंज येथे गेले होते .बांधकामावर असलेल्या मजुराची आठवडी मजुरी मजुरांना वाटप करून आणि काही किरकोळ कामे आटोपून देसाईगंज येथून आपल्या गावी कोंढाळा कडे येण्याकरीता निघाले होते मात्र आरमोरी मार्गे देसाईगंज कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ॲम्ब्युलन्सने अगदी कोंढाळा गावच्या टोकाजवळ गुरदेव वसाके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला या अपघातामध्ये गुरुदेव वसाके हे गंभीररीत्या जखमी झाले .आणि दुचाकी पूर्णतः डॅमिज झाली .मुख्य मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यानी घटनेची माहिती घरच्याना देऊन लगेच गुरुदेव वसाके यांना रुग्णालयात नेण्यासाठी




 पुढाकार घेतला .मात्र अती रक्तस्त्राव झाल्याने गुरुदेव यांची प्रकृती अती खालावल्याने आणि अपघातामध्ये झालेली दुखापत गंभीर असल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच गुरुदेव वसाके यांचा मृत्यू झाला. घरातील करता ,मुख्य ,जवान होतकरू बेरोजगारीवर मात करून व्यवसायाच्या रूपातून उंच भरारी घेऊन यशाचे शिखर गाठलेला बांधकाम व्यावसायिक एकाकी निघून गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे गावात व गाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत .

0/Post a Comment/Comments