महिलेला गुंगीचे औषध देऊन महिलेचे काढले विवस्त्र फोटो.. फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले पैसे..



विदर्भ दखल न्यूज 
नाशिक ब्युरो 
नाशिक 


राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतानाच नाशिक शहरांमध्ये एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे विवस्त्र फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळल्याचा धक्कादाय प्रकार उजेडात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयीत निलेश अशोक पगार वय वय 35 वर्षे व पिढीत महिला यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळखी झाली होती आणि त्या माध्यमातून दोघे एकमेका जवळ आले. मात्र प्रत्यक्षरीत्या दोघांनी 26 मार्च 2020 ला प्रत्यक्ष एकमेकांसोबत भेट घे ण्याचे ठरवले होते आणि ते भेटले सुद्धा या भेटीदरम्यान दोघांनी दहा वाजेच्या सुमारास एका हॉटेलवर विश्रांती घेतली विश्रांती दरम्यान निलेशने पिढीतेला पाण्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला दिले आणि ती गुंगीच्या औषध पिल्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि याचाच फायदा घेत निलेशने तिचे विवस्त्र फोटो काढले काही दिवसांनी तिला फोनवरून संपर्क करून तिला पैशाची मागणी केली आणि जर मला पैसे नाही दिले तर तुझे


               
                     संपर्क दिनेश बनकर 
                     9130423130
                    7822082216

 विवस्त्र फोटो. सोशल मीडियावर वायरल करणार अशी तिला धमकी देऊन तिच्याकडून वारंवार रोख रक्कम व चेकच्या स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने तिच्याकडून पैसे उकळले मात्र वारंवार त्याचा ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा त्रास काही थांबला नाही यामुळे पिढीतेला मोठा मानसिक त्रास जाणवू लागला यामुळे अखेर पिढीत महिलेने हिंमत करून निलेश अशोक पगार याची पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिस विभागाने पीडितेच्या तक्रारीवरून निलेश पगार याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत

0/Post a Comment/Comments