विदर्भ दखल न्यूज
संपादक - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
हिंगोली - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असून कांग्रेस - रिपाई युतीत कांग्रेसने रिपाईला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर मैत्री निभवा अन्यता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने उमेदवार उभे करून कांग्रेसला धडा शिकवा कारण कांग्रेस डुबल्याशिवाय त्यांना रिपाई आठवणार नाही अशा ठणठणीत ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी हिंगोली येथे पार पडलेल्या रिपाईच्या राष्ट्रीय अधिवेशनात रिपाई कार्यकर्त्यांना सांगीतले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दि. ७ डिसेंबरला हिंगोली येथे पार पडले. यात रिपाईच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमरजित सिंग धुन्ना (पंजाब) यांची अविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन कमलताई गवई ,रामराज दाभाडे जक्कपाजी कांबळे प्रा. अजितसिंह चहल ॲड. तेलुराम (हरियाणा ) प्रा. सोहन ( तामीलनाडू ) गोपाल रायपूरे किसनराव जावळे ॲड. माजरमकर आदि लाभले होते तर कार्यक्रमाचे आयोजक मधुकर माजरमकर हिंगोली हे होते.
रिपाईचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अमरजित सिंग धुन्ना यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित पक्ष असल्याने त्या पक्षाची वाटचाल संपूर्ण भारत देशातील कोनाकोपऱ्या पर्यंत वाढणीसाठी प्रयत्न असुन सर्वप्रथम पंजाब राज्यातील निवडणुका रिपाई बॅनरवर लढण्याचा निर्धार व्यक्त केला. हिंगोली येथील
रिपाईच्या राष्ट्रीय अधिवेशनात गोपाल रायपूरे शिध्दार्य सुमन रिपाई गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर
बोरकर चंद्रपूर रिपाई अध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे रिपाई नेते बाजीराव उंदिरवाडे राजेंद्र पाटिल अशोककुमार उमरे वाघमारे आदि सहीत संपूर्ण जिल्यातील कार्यकर्ते तथा विविध राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसगी हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्षाचा सत्कार करण्यात आले.




Post a Comment