विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
ब्रम्हपुरी - ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंढकी च्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले असून वाघाने त्या शेतकऱ्यांच्या शरीराचे सर्व अवयव फस्त केले असुन फक्त मुंडकेच ठेवले एवढी धक्कादायक अंगाला काटे आणणारी घटना मेंढकीच्या जंगलात घडली.
आज दि. १० ऑक्टोंबर २०२५ ला मेंढकी गावातील शेतकरी भाष्कर गजभिये वय ६० हा सकाळीच भारे बांधण्यासाठी शिंद आणायला जवराबोळी मेंढा च्या जंगलात गेला होता. त्याने शिंदिचा गठ्ठा बांधला व आता
घराकडे जाणार एवढ्यात झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने भाष्कर यांच्यावर झडप मारून त्याला झुडपात नेवून भुकेल्या वाघाने भाष्कर च्या शरीराचे संपूर्ण अवयव फस्त केले शेवटी गावकऱ्यांना मुंडकेच सापडले. भाष्कर घरी आला नाही म्हणुन सकाळी ९ च्या सुमारास गावातील व्यक्तीने शोध मोहीम सुरू केली असता जंगलात त्याचे मुंडकेच सांपडले सदर बातमी वनविभाग व पोलीस स्टेशन मेंढकी दिली असता अधिक तपास सुरु आहे.
भाष्कर गजभिये याला पत्नी नसुन त्याचे पश्चात मुलगा सुन व नातु अशा आप्त परिवार आहे. भाष्कर च्या अश्या अकस्मित निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment