विदर्भ दखल न्यूज
पुणे ब्युरो
पुणे
पुणे ते सोलापूर राज्य मार्गावर महामार्गावर मंगळवारी सायंकाळच्या साडेपाच वाजेच्या सुमारास एक भरधाव कंटेनर विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दुचाकीवर स्वार पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे खंडू नारायण बनसोडे आणि रुद्र खंडू बनसोडे असे मृत्यू झालेल्या पिता पुत्राचे नाव आहे मात्र कंटेनरचा चालक जागेवरून पसार झाला पोलीस प्रशासनाने अज्ञात कंटेनरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या खंडू बनसोडे यांचे चुलत भाऊ संतोष बनसोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार खंडू बनसोडे हे दुचाकी ने आपल्या मुलासोबत पुणे सोलापूर या मार्गाने जात होते एवढ्यातच विरुद्ध दिशेने भरदाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झाला घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment