नगरपरिषद निवडणूक करिता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना शिंदे गट महिला जिल्हा आघाडी प्रमुख बेपत्ता...


विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो




आरमोरी
सध्याच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे धामधूम चालू आहे. आणि नगरपरिषद निवडणूक उमेदवारी संदर्भात नाम निर्देशन पत्र सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे. आणि अश्यातच आरमोरी येथील नगरपरिषद निवडणुकी संदर्भात पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने महिला शिंदे गटाच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख अर्चना गोंधोळे ह्या कालपासून आरमोरी येथून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे आरमोरी नगरपालिके करिता अर्चना गोंधोळे यांनी शिवसेना शिंदे गट पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्षांमध्ये इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी अर्ज करिता संधी दिल्याने अर्चना गोंधोळे यांच्या मानसिकतेला जबर धक्का बसल्याचे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे .अर्चना गोंधळे यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात राहून रात्रंदिवस मेहनत करून पक्षाकरिता मोलाची भूमिका बजावली आहे आणि पक्ष वाडीकरिता मेहनत सुद्धा बऱ्यापैकी घेतली आहे. मात्र नगरपरिषद निवडणुका लागल्या आणि पक्षाकडे उमेदवारी मागितली असता अर्चना गोंधोळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि याच विवंचनेतून त्या घरातून निघून




 गेल्याची माहिती अर्चना गोंधळे यांचे पती संतोष गोंधोळे यांनी दिली आहे. मात्र अद्यापही पोलीस ठाणे येथे त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. महिला जिल्हा आघाडीच्या प्रमुख अर्चना गोंधोळे यांच्या पतीचे म्हणणे आहे की पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचे त्यांनी आरोप केले आहे गेल्या 20 तासापासून माझी पत्नी अर्चना गोंधळ ह्या बेपत्ता आहेत मात्र त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास पक्षातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी जबाबदार राहतील असे त्यांचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणबाबत विदर्भु दखल न्यूजच्या प्रतिनिधीने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख  यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही

0/Post a Comment/Comments