विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्या अंतर्गत येथे असलेल्या पालोरा अंतरजी मुख्य रस्त्यावरील दुधवाही नाल्याजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दूधवाई नाल्याजवळ एका अनोळखी इसमाचा एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे घटनेची माहिती परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरमोरी पोलीस ठाण्याला दिली आरमोरी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या पंचनामा केला असून सदर
व्यक्ती हा 30 ते 40 वयोगटातील असल्याचे माहिती मिळाली आहे. मात्र सदर व्यक्ती कोणत्या गावचा आहे हे मात्र अद्याप कळले नाही. पोलीस प्रशासन मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील गावांमध्ये तसेच मोबाईल लोकेशन हरवल्याच्या तक्रारीवरून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गळफास अवस्थेत आढळलेल्या मृतदेह हा आत्महत्या आहे की काही घातपात आहे. हे मात्र पोलीस प्रशासनाच्या चौकशी अंति कळणार आहे. घटनेच्या पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.


Post a Comment