जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करा.. ढीवर भोई जमाती संघटनेची मागणी... वैरागड येथील प्रकरण...

 

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 



वैरागड जादूटोणा करण्याच्या संशयावरून दिव्यांग वृद्ध मजुरास त्याच्या बहिणीच्या घरात मध्यरात्री घुसून पंढरी दुमाने कुटुंबातील चौघांना मारहाण करण्यात आली या सर्व आरोपीवर जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणात सहभागी आणखी तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ढीवर- भोई जमाती संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे.
वैरागड येथील चिरकुटा विठोबा मेहेरे कुटुंब एका विशिष्ट पंथाचे सेवक असून त्यांच्या घरातील सदस्यांना जादूटोणा केला. त्यांच्या सुनेला रात्रीच्या वेळी एक चालती कणकीची बाहुली जवळ येते आणि अदृश्य होते यासारख्या भूतबादेच्या मागे विठ्ठल शेंडे नावाचा व्यक्ती आहे हा शोध पुजारी हरिदास बालपांडे रा.रुई (ता. ब्रह्मपुरी) यांनी




 लावला आणि मेहरे कुटुंबियांना हा जादूटोणा परतवण्यासाठी हरिदास बालपांडे यांच्या हस्ते पूजा-पाठाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले दि. 24 नोव्हेंबर च्या रात्री जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पूजा पाठाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली या दरम्यान चिरकुटा मेहेरे यांच्या सुनेच्या अंगात भूतबादा झाली आणि मला विठ्ठल शेंडे नावाच्या व्यक्तीने जादूटोणा केला असे सांगितले.



या पूजा पाठाच्या कार्यक्रमात सहभागी दुसऱ्या गावावरून आलेले मेहंदी बाबाचे सेवक, मेहेरे कुटुंबातील सदस्य मध्यरात्रीच पंढरी दूमाने यांचे घर गाठले त्यांना झोपेतून उठवून विठ्ठल शेंडे या जादूखोराला घरात ठेवता म्हणून घरातील लोकांना झोपेतून उठवून मारहाण केले पंढरी तुकाराम शेंडे (60) या अपंग वृद्धाला खाटेवरून ओढून त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करीत पूजेच्या ठिकाणी मेहरे यांच्या घरी नेले नंतर रात्रीच वैरागड येथील पोलीस पाटील यांना बोलवून याने माझ्या सुनेला जादूटोणा केला यासाठी याला कबुलीसाठी आणले असे सांगून पुन्हा त्या ठिकाणी पुजारी असलेल्या हरिदास बालपांडे यांनी व इतर सेवकांनी मारण्यास सुरुवात केली पण पोलीस पाटलांनी मध्यस्थी करून व या चुकीच्या कामाची समज देऊन पंढरी शेंडे यांची सुटका केली.
दि. 25 नोव्हेंबर ला सकाळी पंढरी जणू दुमाने, लक्ष्मी पंढरी दूमाने, विठ्ठल तुकाराम शेंडे, किशोर पंढरी दूमाने यांनी झालेल्या प्रकाराची लेखी तक्रार आरमोरी पोलिसात दिली व या तक्रारीत हरिदास भीषण बालपांडे रा. रुई (ता. ब्रह्मपुरी) चिरकुटा विठोबा मेहरे, प्रकाश चिरकुटा मेहरे, प्रमोद



 चिरकुटा मेहरे, धनपाल घनश्याम बावनकर, ज्योती प्रकाश मेहरे, मेघा प्रमोद मेहरे सर्व रा. वैरगड या सात जणा व्यक्तीचे नाव होते पण आरमोरी पोलिसांनी प्रकाश चिरकुटा मेहरे, प्रमोद चिरकुटा मेहरे, धनपाल घनश्याम बावनकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही तरी या तिघांवर व कार्यक्रमात उपस्थित बाहेर जाऊन आलेले मेहंदी बाबाचे सेवक सर्व आरोपीवर जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ढिवर- भोई जमाती संघटनेचे पदाधिकारी प्रा. भाग्यवान मेश्राम, सुरेश खेडकर, रामदास डोंगरवार, राजेंद्र मेश्राम, बाबुराव शेंडे ,शालू दुमाने वैशाली डोंगरवार, शालिनी दुमाने यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी यांच्याकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments