डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्था कोजबी यांच्या वतीने 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब यांना अभिवादन...


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 
दिनांक 6 डिसेंबर 2025



डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्था कोजबी यांच्या वतीने 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब यांना अभिवादन
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात महामानव परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन करण्यात आले संस्थेच्या वतीने बाबासाहेब यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण










 करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून बाबासाहेब यांचे कार्य खूप महान होते असे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्ताविक संचालन संस्थेच्या कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धन यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव भारत कुमरे यांनी मांनले महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर सचिव भारत कुमरे कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धन संस्थेचे संचालक गण उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments