विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली .
चामोर्शी - दिनांक 6 डिसेंबर 2025 रोज शनिवार ला विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमि .त्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक अरुण राऊत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक संतोष सुरावार, जेष्ठ शिक्षक अरुण चौधरी,अरुण खरवडे, देवानंद बोरकर, गोकुळ झाडे, प्रशांत घरत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महापरिनिर्वान दिनाचे प्रास्ताविक मार्गदर्शन प्रशांत घरत यांनी केले. यांनंतर इयत्ता 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत सुद्धा सादर केले.यांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण राऊत सर यांनी अध्यक्षीय भाषणात विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन भुवनेश्वर चुधरी यांनी केले तर आभार योगेश नवघडे यांनी मानले. आणि कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
यांनंतर लगेच आनंददायी शनिवार उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षा या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक अरुण राऊत उपस्थित होते. तर विशेष मार्गदर्शक म्हणून चामोर्शी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री दिपकजी डोंब उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक संतोष सुरावार हे उपस्थित होते. तसेच पोलीस शिपाई खोबरे उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री दीपकजी डोंब यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली व भविष्यातील शिक्षण आणि विविध व्यवसायाच्या संधी याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आशिष येणोरकर यांनी केले तर आभार संतोष सुरावार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Post a Comment