विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जातो
गडचिरोली जिल्ह्यातील जल, जंगल, जमीन,ही आदिवासी बांधवाची अस्मिता आहे
गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावित असताना सुद्धा जिल्ह्यातील आदिवासी बांधव जल, जंगल, जमिनीचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र झटलेले आहे
नक्षलवाद संपल्याने सुटकेचा श्वास घेणाऱ्या
आदिवासी समाजाच्या हक्काचे असलेले जल, जंगल, जमीन
सत्ताधाऱ्यांनी लॉयड मेटल्स कंपनी ची सुरजागड लोहप्रकल्प खाण आणि इतर कंपन्यांना कवडीमोल भावात देऊन आदिवासी समाजावर अन्याय केला आहे
असा आरोप MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी केला आहे
लोहखनिज उत्खनन करून हजारो कोटी रुपये उद्योगपती आणि सरकारच्या घशात घातले जात आहे
आदिवासी समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचवून
जल, जंगल, जमीन हिसकावून
जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करणे म्हणजे
आदिवासी समाजाची दिशाभूल करणे आहे
सत्ताधाऱ्यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असेल तर
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित
आदिवासी समाजाशी जाहीर माफी मागावी
आणि जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित आदिवासी बांधवाची अस्मितेची शान असलेले
जल, जंगल, जमीन, आदिवासी बांधवांना परत देण्यात यावी
असे MIM जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी म्हटले आहे 🙏

Post a Comment