इंजेवारीच्या जंगलात वाघाचा थरार! चारा आणण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली आरमोरी 


इंजेवारीच्या जंगलात वाघाचा थरार! चारा आणण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील बकऱ्याणा जंगल परिसरात चारा आणण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित इसम जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे इंजेवारी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाघाच्या हल्ल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वाघाचा तातडीने बंदोबस्त करा!
इंजेवारी येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे जोरदार मागणी केली आहे की, संबंधित जंगल परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. वाघाचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विदर्भ दखल न्यूज मुख्य संपादक : दिनेश रामाजी बनकर (BAMCJ), गडचिरोली

0/Post a Comment/Comments