विदर्भ दखल न्यूज
आरमोरी वैरागड
प्रतिनिधी
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या वैरागड येथे पौराणिक आणि पुरातत्व विभाग अंतर्गत येत असलेल्या
आणि विराट राजाचा गड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या किल्ल्यातील विहिरीमध्ये वैरागड येथील रहिवासी आणि पुरातत्व विभाग अंतर्गत किल्याच्या कामावर असलेल्या कामगाराचा
किल्ल्यातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 9 ..11.. 2026 रोजी सकाळी 9 वाजे सुमारास घडली. सोनू माधव पिठाले अंदाजे वय 32 वर्ष राहणार वैरागड असे मृतकाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार वैरागड येथील पुरातत्त्व विभागाअंतर्गत येत असलेल्या पौराणिक आणि विराट राजाचा गड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याच्या कामावर पहारेकरी कामगार म्हणून शासनाच्या वतीने सोनू माधव
पिठाले वय 32 वर्ष हा युवक 5 वर्षापासून किल्ल्याच्या कामावर होता अशी माहिती मिळाली आहे नेहमी प्रमाणे तो 9.11.2026 रोजी सकाळी आपल्या किल्ल्याच्या कामावर गेला काही किल्ल्यातील कामे करीत असताना आणि
विहिरीजवळून जात असताना त्याचा अचानक विहिरीत तोल गेल्याने तो विहिरीमध्ये पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती आहे. ही बाब वैरागड येथील काही लोकांच्या लक्षात येताच गावातील
लोकांनी किल्ल्याकडे धाव घेतली आणि घटनेची माहिती वैरागड येथील पोलिस पाटलांना दिली पोलीस पाटील यांनी आरमोरी पोलिस यांना माहिती दिली आरमोरी पोलिस लगेच
घटनास्थळावर दाखल होऊन मृतकाचा पंचनामा करून मृतकाचे शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविले आणि शव विच्छेदनानंतर मृतकाचे शव नातेवाईकाच्या सुपूर्द केले अशी
माहिती मिळाली आहे सोनू पीठाले हा अविवाहित होता आणि तो कुटुंबाचा आधार होता कुटुंबातील हा आधार एकाकी गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. गाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे
घटनेचा तपास आरमोरी पोलीस करीत आहेत







Post a Comment