18 वर्षीय युवतीने विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या.. गडचिरोली जिल्ह्यातील घटना

विदर्भ दखल न्यूज 
कुरखेडा 


कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील कुमारी मुन्नी दीपक हुडको वय 18 वर्ष या युवतीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे घडली
मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील कु. मुन्नी हुडको ही युवती आपल्या शेतावरती सकाळच्या सुमारास गेली होती. मात्र बराच वेळ होऊन सुद्धा ती घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शेताकडे धाव घेतली असता घरच्यांना ती बेशुद्ध अवस्थेत पडली दिसली आणि तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच 
तिला तातडीने लगेच मालेवाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

मात्र तीची हळूहळू प्रकृती जास्त खालावत गेल्याने तिला मालेवाडा येथील डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिला पुढील उपचाराकरिता कुरखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.सदर युवतीवर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली अशी माहिती मिळाली आहे.तिच्या एकाकी जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मालेवाडा येथील युवतीने शेतावर जाऊन का? म्हणून विषारी द्रव्य प्राशन केले हे मात्र तपास अंती कळून येईल

0/Post a Comment/Comments