विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गावोगावी अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. कुठे अवैध धंद्यांना ऊत आला आहे, तर कुठे शासकीय विकासकामे निधीअभावी किंवा प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडली आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत, तर काही ठिकाणी शासकीय निधीच्या वापराबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
गावातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, घरकुल योजना, ग्रामपंचायत विकासकामे, शाळा, आरोग्य सुविधा, शासकीय योजना आणि इतर सार्वजनिक कामांमध्ये काही अनियमितता आढळते आहे का?
अवैध दारू विक्री, अवैध उत्खनन, जुगार किंवा इतर बेकायदेशीर व्यवसायांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत आहे का?
आता तुमच्या गावातील प्रश्न मांडण्याची वेळ आली आहे!
विदर्भ दखल न्यूज डिजिटल मीडिया जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावोगावी पोहोचणार आहे.
आमचे विशेष जनहित अभियान गावातील अवैध धंद्यांचा प्रश्न.
रखडलेली शासकीय विकासकामे.
सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत तक्रारी.
शासकीय निधीच्या वापराबाबत संशयित अनियमितता.
ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रश्न.
शेतकरी, विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिकांच्या समस्या.
मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांमधील अडचणी.
नागरिकांना आवाहन!
आपल्या गावात काही चुकीचे घडत असेल, सार्वजनिक कामांमध्ये अनियमितता दिसत असेल किंवा एखादा महत्त्वाचा प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित असेल, तर त्याची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आणि उपलब्ध कागदपत्रांसह विदर्भ दखल न्यूजकडे पाठवा.
प्राप्त तक्रारींची योग्य पडताळणी करून संबंधितांची बाजू जाणून घेतली जाईल आणि वस्तुस्थितीच्या आधारे बातमी प्रसिद्ध केली जाईल.
लक्षात ठेवा, गावाचा विकास हा प्रत्येक
नागरिकाचा अधिकार आहे आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक प्रशासन ही काळाची गरज आहे!
गाव तिथे विदर्भ दखल न्यूज धावून जाणार!तुमची समस्या, आमची बातमी!
मागणी तुमची, कलम आमची!
विदर्भ दखल न्यूज – गडचिरोली सुपरफास्ट न्यूज
गोरगरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज!

Post a Comment