विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली आरमोरी
*आरमोरी :* आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, सालमारा व परिसरात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले आणि कापून शेतात ठेवलेले धान अवकाळी पाऊस व वादळामुळे भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतातूर झाला आहे.
*हाता-तोंडाशी आलेला घास...*
वर्षभर राब-राब राबून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी धान पिकवले. कापणी झाली, आता फक्त मळणी बाकी होती. पण ऐन वेळी आलेल्या अवकाळी वादळाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. कापून ठेवलेले धान पाण्यात भिजले तर ते काळे पडून, अंकुर फुटून पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे.
*"शेतकरी हे फटके सोसणार का?"*
हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आहे. आधीच कर्ज, मजुरी, खत-बियाण्याचा खर्च, त्यात आता निसर्गाचा फटका. शेतकरी जायचा कुठे?
*शासन मदत करणार का?*
शेतकऱ्यांची आता एकच मागणी आहे - शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. पीक विमा, नुकसान भरपाई मिळणार का? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने तातडीने शेतात जाऊन पाहणी करावी, अशी मागणी जोगीसाखरा, सालमारा परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Post a Comment