जांभूळखेडा येथे सांस्कृतिक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद* आदिवासी डान्स ग्रुप व जय बिरसा डान्स ग्रुपला समूह नृत्यात संयुक्त प्रथम क्रमांक; गुणवंतांचा सत्कार


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
कुरखेडा 


 दीपावलीच्या औचित्याने नवयुवक मित्रांगण मंडळ, जांभूळखेडा यांच्या सौजन्याने १० नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील विविध गावांतील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या नृत्यकलेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कुरखेडा तालुका प्रमुख आशिषभाऊ काळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुका प्रमुख जीवन पाटील नाट होते. तर उपाध्यक्ष म्हणून भाजपचे तालुका प्रमुख चांगदेव भाऊ फाये व प्रा. उमाताई चंदेल उपस्थित होते.
समूह नृत्य स्पर्धेत आदिवासी डान्स ग्रुप, जांभूळखेडा आणि जय बिरसा डान्स ग्रुप, इडदा यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जय सेवा डान्स ग्रुप, शिरपूर तर तृतीय क्रमांक शारदा डान्स ग्रुप, जांभूळखेडा यांनी मिळविला.
१४ वर्षांवरील एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सलोनी दोनाडकर, द्वितीय क्रमांक अस्मि कोटंगले यांनी पटकावला. तर १४ वर्षांखालील गटात प्रथम पूर्वेश मांढरे, द्वितीय माही करमकार आणि तृतीय यादवी बन्सोड यांनी यश संपादन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना समूह नृत्य गटात अनुक्रमे 7001 रुपये, 4001 रुपये व 2001 रुपये, तर १४ वर्षांखालील एकल नृत्य गटात 1501 रुपये , 1001 रुपये व ५०१ रुपये आणि १४ वर्षांवरील गटात 2001 रुपये , 1501 रुपये व 501 रुपये रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या युवक-युवतींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये गडचिरोली पोलीस विभागात नियुक्त झालेल्या कल्याणी पाटणकर, उदय कीर्तनिया व प्रमोद राऊत, वनरक्षकपदी नियुक्त पुरुषोत्तम तुलावी, महसूल विभागात नियुक्त वैभव लोहंबरे तसेच सुरक्षा दलात नियुक्त प्रणय हलामी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला गिरीधरजी तितराम, चंद्रमा सर, प्रा. पाटणकर सर, प्रल्हादजी धोंडणे, कोटंगले सर, दादगाये सर, लोहंबरे सर, देवानंदजी लोहंबरे, सत्यमजी लोहंबरे, ओमेशजी लोहंबरे, गणपतजी बन्सोड, मनीषाताई कवरके, नरेशजी नैताम, कल्पना नैताम, अरुणा डोकरमारे, कुंडलिक दादगाये, अशोकजी बन्सोड, पोलीस पाटील हिरालालजी नंदेश्वर, उत्तमजी कीर्तनिया, नरेंद्र धोंडणे, अशोकजी कवरके व अरुणजी गुजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण जोशना बन्सोड, पूजा राठी, रवींद्र गावंडे सर व कुलदीप सहारे सर यांनी केले. देवनाथ नैताम व येनिदास कवरके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रुपेश शिवरकर यांनी केले, तर आभार मंडळाचे अध्यक्ष चरण बन्सोड यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धर्मा दरवडे, मनोज उईके, रमेश कवरके, मनीष हजारे, करण मडावी, तुषार शेंद्रे, विशाल कवरके, लक्ष्मण मेश्राम व रोहित नदेश्वर यांनी सहकार्य केले. सांस्कृतिक कलेला व्यासपीठ मिळण्यासोबतच गावातील नवोदित गुणवंतांचा गौरव झाल्याने कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

0/Post a Comment/Comments