विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोली | दि. ६ नोव्हेंबर २०२६
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या वतीने आज शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या 'कर्तव्यकक्ष' जनसंपर्क कार्यालयात आदिवासी मोर्चाची जिल्हा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आदिवासी समाजाचे न्याय्य हक्क, सामाजिक विकास, संघटनात्मक बळकटीकरण तसेच १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन जिल्हाभरात व्यापक स्वरूपात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या मंचावर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, अनुसूचित जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, आणि ज्येष्ठ नेत्या डॉ. चंदाताई कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अनुसूचित जनजाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये न.प. सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका वर्षा शेडमाके, माजी सभापती रंजिता कोडापे, मोर्चाचे जिल्हा महामंत्री विनय मडावी, रेवणनाथ कुसराम, ओंकार मडावी आणि प्रशांत आत्राम यांचा समावेश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, सामाजिक सन्मान आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील भाजपा सरकारने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेला १५ नोव्हेंबर हा 'जनजातीय गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.
यासोबतच माजी खासदार डॉ. नेते यांनी पुढे बोलतांना म्हणाले दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस म्हणजेच १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजातीय गौरव दिन' म्हणून घोषित केला. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी देशात पहिला जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेले योगदान, त्यांचे बलिदान, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, तसेच भावी पिढीला या महान क्रांतिकारकांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी,
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून उभारलेला 'उलगुलान' हा ऐतिहासिक लढा आजही समाजाला संघर्ष, स्वाभिमान आणि एकतेची प्रेरणा देतो. महान क्रांतिकारकांच्या विचारांचा आणि बलिदानाचा वारसा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.यासोबतच माझ सर्वाना आवाहन आहे की,९ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन साजरा न करता १५ नोव्हेंबर जनजाती गौरव दिन साजरा करावा.
त्यामुळे यंदा १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि शहरासह संपूर्ण देशभर उत्साहात, व्यापक स्वरूपात आणि जनसहभागातून साजरा करण्यात यावा. आदिवासी समाजातील बांधवांनी, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा व आदिवासी क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी बैठकीत केले.
बैठकीत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर, संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यावर तसेच जनजातीय गौरव दिनाच्या आयोजनाबाबत जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
जय सेवा, सेवा जोहार!' या घोषणेसह आदिवासी समाजाचा स्वाभिमान, एकता आणि गौरवशाली परंपरा जपण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला. कार्याचा केला उल्लेख_*

जय सेवा, सेवा जोहार!' या घोषणेसह आदिवासी समाजाचा स्वाभिमान, एकता आणि गौरवशाली परंपरा जपण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Post a Comment