Writing
विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
आरमोरी तालुक्यातील करपडा परिसरातील शेतीशिवारात जंगली हत्तीने दिनांक ५.११.२०२६रोजी रात्रीच्या सुमारास शेती शिवारात धुमाकूळ घालत
शेतातील धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून शेतकऱ्यांनी उभे केलेले धान्य पीक जंगली हत्तीच्या उपद्रवामुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे.
आधीच शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, नैसर्गिक संकटे आणि पिकांच्या उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच जंगली
हत्तींचा शेतीशिवारात वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
वन विभागाने तातडीने दखल घ्यावी
करपडा शेतीशिवारातील झालेल्या पिकांच्या नुकसानीची वन विभागाने तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य व तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जंगली हत्तींचा शेतीशिवारातील वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. केवळ पाहणी करून न थांबता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचा सवाल : शेतीचे नुकसान सहन करायचे किती दिवस?
शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना वन विभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी आता शेतकरी यांच्याकडून होत आहे.
विदर्भ दखल न्यूज
गोर गरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज
मागणी तुमची, कलम आमची!







Post a Comment