गोर गरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज! मागणी तुमची, कलम आमची! चालू कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार कधी? शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत..

Writing





विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
शेतीसाठी कर्ज घेऊन नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार कधी, असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. कर्जाची नियमित परतफेड करूनही प्रोत्साहन अनुदानाबाबत खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीचे वाढते दर यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले परंतु बराच कालावधी होऊन सुद्धा चालू कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न आल्याने प्रोत्साहन पर अनुदान मिळणार की नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित होऊ लागला आहे.
घोषणेची प्रतीक्षा की प्रत्यक्ष लाभाची?


नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ कधी मिळणार, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

अनुदानासाठी पात्रता निकष काय असतील, लाभार्थ्यांची यादी कधी जाहीर होणार आणि अनुदानाची रक्कम खात्यात कधी जमा होणार, या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

शासनाने तातडीने स्पष्टता द्यावी!
राज्य शासन आणि संबंधित कृषी व सहकार विभागाने प्रोत्साहन अनुदानाबाबतची सद्यस्थिती स्पष्ट करून पात्र शेतकऱ्यांना अधिकृत माहिती द्यावी. 

तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक जाहीर करून पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय मिळणार का? आता शासनाच्या पुढील भूमिकेकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments