लोहारा ते कोजबी गणेशपुर मुख्य रस्त्यावर होता झुडपाचा वेढा. प्रवास धारक वाहन धारकांना मार्गक्रमण करताना होत होता अडथळा..बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने झुडपाचा वेढा केला साप. प्रवासधारक वाहनधारकांमध्ये संस्थेप्रती होत आहे समाधान व्यक्त.

विदर्भ दखल न्यूज 
तालुका प्रतिनिधी 
आरमोरी 

लोहारा ते कोजबी गणेशपुर मुख्य मार्गावर बऱ्याच दिवसापासून झुडपाचा वेढा होता आणि मुख्य मार्ग झुडपाणे वेढले असल्याने वाहतुकीस रहदारीस 



वाहनधारकांना मार्गक्रमण करण्याकरिता मोठा अडथळा निर्माण होत होता आणि अपघात होण्याची शक्यता बळावली होती.

याची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर यांच्या मनामध्ये आल्याने त्यांनी प्रत्यक्ष. मार्गावर झुडपाणे वेढलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून मुख्य मार्गावरील झुडपाला साफ केले

आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासधारकांना रस्ता खुला करून रहदारीचा मार्ग मोकळा करून दिला . लोहरा कोजबी वडधा मार्गाने बऱ्याच प्रमाणामध्ये



रात्र दिवसा वाहतूक चालत असल्याने मार्गावरून प्रवास करीत असताना वाहन धारक व प्रवास धारकांना त्रास होऊ नये अडचण होऊ नये या करिता डॉ. बाबासाहेब




 आंबेडकर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने सदर जण हितार्थ कार्य करण्यात आले . रस्त्यावरील झुडपाच्या वेढा साफ करण्यात आल्याने वाहन धारक प्रवास धारकामधे संस्थे प्रति समाधान व्यक्त होत 

आहे संस्थेची वाहवा केली जात आहे.
 यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश रामाजी बनकर संस्थेचे सचिव भारत मधुकर कुमरे कोजबी येथील ग्रामस्थ देविदास मानकर साहिल चहांदे आदींची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments