अनन्या ऊईके या विद्यार्थिनीची विभागीय स्पर्धेसाठी निवड शिवाजी इंग्लिश अकादमी स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा.. विद्यार्थिनीचे सर्वत्र होत आहे कौतुक..


विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली


*गडचिरोली :* शालेय जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा *2026-27* नुकतीच *16 सप्टेंबर 2026 रोजी क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली* येथे पार पडली. या स्पर्धेत *शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल, गडचिरोली* येथील इयत्ता *6 वीची विद्यार्थिनी कु. अनन्या सोमनाथ उईके* हिने उत्कृष्ट कामगिरी करत *प्रथम स्थान पटकावले*.

अनन्या उईके हिची या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर *विभागीय स्तरावरील किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड* झाली आहे. तिच्या या यशामुळे शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनन्याच्या या यशाबद्दल *संस्था अध्यक्ष अनिल पा. मशाखेत्री, मुख्याध्यापिका शालिनी वाकुडकर, उपप्राचार्य संगीता खुणे, पर्यवेक्षक अरविंद बडी आणि क्रीडा शिक्षक अनिकेत नैताम* यांनी तिचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments