विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -मुनिश्वर बोरकर
संपादक
*गडचिरोली(DEMO)15:-*
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील जनतेला दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, चामोर्शी तालुक्यातील उमरी आणि भामरागड तालुक्यातील कुवाकोडी व फोदेवाडा येथील नवनिर्मित 'आरोग्य वर्धिनी उपकेंद्रां'चे नुकतेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (Online VC) शानदार ई-लोकार्पण करण्यात आले.
या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे, मा. ना. प्रकाश आबिटकर,राज्यमंत्री (वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार) तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल सह पालकमंत्री गडचिरोली,सन्माननीय सर्व आमदार, खासदार महोदय,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव श्री. निपुण विनायक यांची प्रामुख्याने व्हर्च्युअल उपस्थिती होती. मान्यवरांनी या ऑनलाईन संवाद (VC) द्वारे या उपक्रमाचे कौतुक करत दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या शासनाच्या कटिबद्धतेवर भर दिला.
यानिमित्ताने चामोर्शी तालुक्यातील उमरी येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्यक्ष कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि चामोर्शीचे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच, या लोकार्पण सोहळ्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, डॉ. प्रफुल गोरे, डॉ. रुपेश पेंदाम, डॉ. महेंद्र पेदाला आणि डॉ. मोहिनी रोकडे, डॉ राजकुमार कुकुडकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला उमरी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कांडा (कंसोबा) येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण:
या नवीन आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांमुळे चामोर्शी आणि भामरागडसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांना आता किरकोळ आजारांसाठी किंवा प्राथमिक उपचारासाठी लांब शहरात जाण्याची गरज भासणार नाही. गरोदर मातांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण आणि संसर्गजन्य आजारांवरील प्राथमिक उपचार आता गावातच अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास याप्रसंगी प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला.
डॉ प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी

Post a Comment