विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
आरमोरी तालुक्यातील
वैरागड आणि परिसरात दोन दिवसांपासून रानटी हत्तींनी धुमाकूळ टाकला असून शेतकऱ्यांच्या शेतातलील उभ्या पिकाचे नुकसान केले असताना आरमोरी रोड वरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाच पांडव देवस्थान येथे रानटी हत्तींनी धुमाकूळ टाकून देवस्थानाचे अतोनात नुकसान केल्याची घटना आज दि. २६ ऑगस्ट २०२६ मध्यरात्री रोजी घटना घडली. यामुळे गावात सामाजिक भावना दुखावल्या.
दि. २५ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्री रात्री रानटी हत्तीच्या कळपाने कढोली रस्त्यावरील वैरागड, पाठणवाडा आणि सुकाळा वन बीट क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोवणी केलेल्या उभ्या पिकातून चालत पिक पायदळी तुडवत धान पिकाचे पूर्णपणे नुकसान केल्याने अनेक शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे.
सुकाळा बीट कक्ष क्रमांक ३८ मधून रानटी हत्तीचा कळप पाठणवाडा आणि वैरागड वन क्षेत्रातून
मार्गक्रमण करीत असताना शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात रोवणी केलेल्या धान पिकांचे अतोनात नुकसान केले. तसेच शेतात राखण्यासाठी असलेले झोपडीचे तोडफाड करून शेतात असलेल्या बोर द्वारे पिकांना पाणी देणाऱ्या पाईपाची सुद्धा नुकसान केले.
हत्तींचा कळप मार्गक्रमण करीत असतांना पुरण मेश्राम, डोनू कांबळे, विनायक मेश्राम, धनीराम तुलावी,वाल्मिक
मेश्राम, सचिन मडावी, दामोधर सहारे, विश्वनाथ मडावी, अविनाश मडावी, मनसाराम कुमरे, तानुजी पदा, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकाची नुकसान केली. याबाबत शेतकऱ्यांनी वैरागड वन विभागास माहिती देताच तत्काळ वैरागड वन क्षेत्र सहाय्यक अधिकारी गजबे यांच्या मार्गदर्शनात वैरागड वनरक्षक कावेरी बिस्वास आणि सुकाळा वन परिक्षेत्राचे वनरक्षक पुणेश कुमरे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला. तसेच आज दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पौराणिक पाच पांडव देवस्थान येथे रानटी हत्तीच्या कळपाने देवस्थानात असलेले सिमेंट मातीचे दोन घोडे आणि त्रिशूळ यांचा तोडफोड करून नुसकान केले.
गावातील नागरिकांनी धार्मिक पाच पांडव देवस्थान नुसकान बाबत जन आंदोलन उभारण्याचे इशारा दिला असता आरमोरी वन परिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, आरमोरी पोलिस स्टेशन ठाणेदार एस. बी. झनक , वैरागड सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, प्रतिभा बनकर,वैरागड वन क्षेत्र सहाय्यक अधिकारी गजबे, वैरागड वनरक्षक कावेरी बिस्वास, कुरंडी
वनरक्षक डी. जे. ढोलने, पाच पांडव समिती पदाधिकारी, भंडारेश्वर समिती पदाधिकारी आणि गावातील नागरिक शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन करून वन विभागास अर्ज सादर करावे. शासनाकडून झालेल्या नुसकान भरपाईची शासनाकडून त्वरित भरपाई देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
वारंवार होणाऱ्या रानटी हत्ती, वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीव प्राण्यांमुळे अगोदरच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे. त्या भागातील अनेक शेतकऱ्यांचे ई.पिक झालेले नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अडचण निर्माण होणार आहे.






Post a Comment